३०० वर्षांपूर्वीच्या भूतासोबत प्रेम विवाह करणाऱ्या महिलेला आता हवा आहे घटस्फोट

ghost
विश्वास न बसणाऱ्या काही घटना जगभरात अनेकवेळा घडत असतात. अशाचप्रकारची एक घटना आर्यलँड येथे समोर आली आहे. ३०० वर्षीय एका समुद्री डाकूसोबत येथील एका महिलेने प्रेम विवाह केला होता. ३०० वर्षाचा म्हटल्यावर साहजिकच तो भूत असणार. जॅक (उर्फ जॅक स्पॅरो) नावाच्या एका समुद्री दरोडेखोरासोबत आर्यलँडच्या जुन्या वस्तीवरील ४६ वर्षीय अमांडा टीगने लग्न केले होते. पण अद्यापही तिने त्याला पाहिले नाही. त्याचा मृत्यू जवळपास ३०० वर्षांपूर्वी झाल्याचे तिने सांगितले.
ghost2
रिपोर्टच्या मते टीग सांगते की, तिच्या पतीला तिने कधीही पाहिले नाही, उलट तो काळा असून त्याचे केस लांब असून त्याला इ.स. १७०० मध्ये त्याला फाशी देण्यात आल्याचे त्यानेच सांगितले. अमांडाचे म्हणणे आहे की, तिच्या नवऱ्यासोबत तिला चांगले वाटते आहे. त्याच्यासोबत ती डेटवर जात असते. एका शक्तिशाली आत्माच्या रूपात जॅकने टीनसोबत विवाह केला होता.
ghost3
अमांडाला आता आपल्या भूत नवऱ्यापासून घटस्फोट हवा असल्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने याबाबत सोशल मीडियावर लिहीले की, सर्वांना मी सांगू इच्छिते की, माझे वैवाहिक आयुष्य आता संपले आहे. सध्यासाठी तरी इतकेच आहे. मी नंतर सांगेल की असे का घडले. मी आता फक्त इतकेच सांगू इच्छिते की, स्प्रिचुअलिटी बाबतीत सावधानी बाळगणे गरजेचे आहे.
ghost1
रिपोर्टच्या मते, अंदाजे एकावर्षापूर्वी ३०० वर्षाच्या भूतासोबत लग्न केल्याच्या गोष्टीमुळे टीग चर्चेत आली होती. तिला त्यावेळी एक सेलेब्रेटी म्हणून अनेक टीव्ही आणि रेडिओ शोज मध्ये आमंत्रित करण्यात आले होते. एफएम १०४ बातमीनुसार जूनमध्ये टीगला सेप्सिस (रक्त संचारासंबंधीचा भंयकर आजार) झाला होता. तिला त्यामुळे रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. टीग तेव्हापासून जॅकसोबत बोलली नाही. यामुळेच तिला जॅकपासून घटस्फोट हवा आहे. पण जॅक एवढ्या लवकर तिची साथ सोडणार नसल्यामुळे आपल्या आयुष्यातून त्याला काढण्यासाठी जादू-टोणाचा सहारा घ्यावा लागणार असल्याचे टीगने सांगितले असल्याचे एफएम १०४ रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.