सौदीचे राजे अब्दुल्लाहने मुलीला लग्नात खरेच दिले होते का सोन्याचे टॉयलेट?

saudi
रियाद – जगभरात २०१४साली एका बातमीने खळबळ माजलेली होती. या वृत्तानुसार मुलीच्या लग्नात सौदी किंग अब्हुल्लाह यांनी सोन्याने तयार करण्यात आलेले टॉयलेट गिफ्ट केले होते. हे लोकांना समजल्यानंतर आश्चर्य वाटले की, नेमके असे सौदी किंगने का केले? जगभरात याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात आले. तसेच दावा करण्यात आला की, या लग्नामध्ये नवरीने १८० कोटींचा सोन्याने मढलेला ड्रेस परिधान केला होता. ७००० कोटींचा खर्च या संपूर्ण लग्नात झाला होता. पण या सर्व वृत्तामागची गोष्ट काहीशी वेगळीच होती.

सौदीच्या राजाने ७ हजार कोटी मुलीच्या लग्नात खरेच खर्च केले असतील का? असा प्रश्न त्यावेळी केला जात होता. पण त्याचे उत्तर नाही असे आहे. कारण असे कोणतेही लग्न २०१४मध्ये झालेच नव्हते. तसेच नवरीचा ड्रेस १८० कोटींचा असल्याची बातमीही खरी नव्हती. सौदी किंगच्या मुलीच्या लग्नाचे जे फोटो आहेत असे सांगितले जात आहे, ते मोरक्कोच्या एका सर्वसामान्य कुटुंबातील लग्नाचे आहेत. या लग्नाचे फोटो पुरावे म्हणून समोर आले आहेत.

मुलीच्या लग्नात सौदी किंगने सोन्याचे टॉयलेट गिफ्ट केल्याची बातमीही जगभरातील सर्व मोठ्या मीडिया हाऊसेसने दाखवली आणि प्रसिद्ध केली होती. तसे पाहता सौदी किंगसाठी ही बाब अशक्य नाही. पण प्रत्यक्षात असे काहीही झालेले नव्हते. ही चर्चा ज्या गोल्ड प्लेटेड टॉयलेटबाबत केली जात होती ते चीनमध्ये एका प्रदर्शनात ठेवण्यात आले होते.

Leave a Comment