इतिहासातील सर्वात क्रूर महिला सिरीयल किलर म्हणून एलिजाबेथ बाथरीला ओळखले जाते. १५८५ ते १६१० या कालावधीत तिने अनेक तरुणींची हत्या केली होती. ती तारुण्य कायम राहावे म्हणून या तरुणींच्या रक्ताने अंघोळ करायची. तिने यासाठी ६५० तरुणींची हत्या केल्याचे समोर आले आहे.
जगातील सर्वात निर्घृण सिरीयल किलर; ६५० तरुणींची केली हत्या
हंगेरी साम्राज्यातील एका गर्भश्रीमंत कुटुंबातील एलिजाबेथ बाथरी ही मुलगी होती. तिचा फेरेंक नॅडेस्डी नावाच्या व्यक्तीबरोबर विवाह झाला होता. तो हंगेरीसाठी तुर्कस्तान विरोधातील युद्धामध्ये हिरो ठरलेला होता. एलिजाबेथ तो जिवंत असतानाही अशा प्रकारे तरुणींची हत्या करायची. पण तिच्या पतीचा १६०४ मध्ये मृत्यू झाला. तिने पतीच्या मृत्यूनंतर कळस गाठला. तिचे हत्या करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढवले होते. स्लोव्हानियाच्या चास्चिस येथील महालात एलिजाबेथ बाथरी राहत होती. तिने या सर्व हत्या त्याचठिकाणी केल्याचे सांगितले जाते.
एलिजाबेथच्या डोक्यात अगदी कमी वयातील तरुण अविवाहित मुलींच्या रक्ताने आंघोळ केल्यास तारुण्य कायम राहील असे भूत शिरलेले होते. ती याच वेडापायी जगातील सर्वात क्रूर सिरियल किलर बनली. तिचे तीन नोकरही या कामात तिला मदत करायचे.