युवराज सिंह होणार बाबा

yuvraj-singh
दोन वर्षापूर्वी क्रिकेटपटू युवराज सिंगसोबत अभिनेत्री, मॉडेल हेजल किचने लग्नगाठ बांधली. या दोघांची ओळख गोव्यात एका पार्टीमध्ये झाली आणि प्रेमात या ओळखीचे रुपांतर झाल्यानंतर या दोघांनी ३० नोव्हेंबर २०१६ रोजी लग्न केले. आता त्यातच त्यांच्या संसारवेलीवर एक चिमुकले फूल उमलणार आहे. हेजल प्रेग्नेंट असून लवकरच त्यांच्या घरी एका नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

नुकताच उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलीचा इशाचा लग्नसोहळा पार पडला. क्रीडाविश्वापासून ते कलाविश्वापर्यंत आणि देशासह विदेशातील दिग्गज मंडळींनी या सोहळ्यामध्ये हजेरी लावली होती. युवराज आणि हेजलही त्यात उपस्थित होते. हेजल यावेळी तिचे पोट लपविण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होती. त्यातच काही जण या दोघांना शुभेच्छाही देत असल्याचे पाहायला मिळाल्यामुळे ‘बॉलिवूड लाईफ’ने हेजल प्रेग्नंट असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, हेजल किंवा युवराजकडून अद्यापही या वृत्ताला अधिकृत दुजोरा न दिल्यामुळे ही गोड बातमी युवराज चाहत्यांसोबत कधी शेअर करणार याकडे साऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

Leave a Comment