भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक ‘ही’ समिती नेमणार

coach
मुंबई – भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदावरून रमेश पोवार यांना हटवल्यावर नव्या प्रशिक्षकाच्या निवडीसाठी बीसीसीआयने नवी समिती तयार केली आहे. विश्वविजेता कर्णधार कपिल देव, दिग्गज महिला क्रिकेटर शांता रंगास्वामी आणि अंशुमान गायकवाड यांचा ३ सदस्यीय समितीमध्ये समावेश आहे.

हे ३ दिग्गज खेळाडू २० डिसेंबरला मुंबई येथील बीसीसीआयच्या मुख्यालयात प्रशिक्षक पदासाठी या मुलाखती घेणार आहेत. भारताचा माजी खेळाडू मनोज प्रभाकर प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत सर्वात पुढे आहे. रमेश पोवार यांनी विंडीज येथे झालेल्या टी-२० विश्वचषकात मिताली राज हिला महत्त्वाच्या सामन्यात बाहेर बसवल्याचा आरोप झाला. तसेच पोवार यांच्यावर अपमानित करण्याचाही आरोप मिताली राजने केला होता. बीसीसीआयने त्यानंतर तिच्या तक्रारीची दखल घेऊन पोवार यांचा प्रशिक्षक पदाचा कार्यकाल वाढवला नाही.

Leave a Comment