शक्तिकांत दास रिझर्व बँकेचे नवे गव्हर्नर

shaktikant
रिझर्व बँकेच्या गव्हर्नर पदाचा मुदतीपूर्वी राजीनामा देऊन पदमुक्त झालेल्या उर्जित पटेल यांच्या जागी नवे गव्हर्नर म्हणून माजी वित्त सचिव शक्तिकांत दास यांची निवड करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाल तीन वर्षाचा असेल. पटेल यांच्या राजीनाम्यानंतर जी नावे चर्चेत होती त्यात दास यांचे नाव आघाडीवर होते. अपेक्षेप्रमाणे त्यांची निवड झाली आहे.

वित्त सचिव पदावर कार्यरत असताना शक्तिकांत दास केंद्रीय आर्थिक धोरणे राबविणारे देशातील सर्वाधिक शक्तिशाली मानले जात होते. नोट बंदी निर्णयाचे त्यांनी समर्थन केले होते. जी २० मध्ये गतवर्षी ते भारताचे प्रतिनिधी होते. त्यांनी महसूल सचिव म्हणूनही काम केले आहे. ते इतिहास विषयातील द्विपदवीधर असून तामिळनाडू केडर चे आयएएस आहेत. रिझर्व बँकेचे ते २५ वे गव्हर्नर बनले आहेत.

Leave a Comment