गुगल आणि लेविस कंपन्यांनी बनवले स्मार्ट जॅकेट; एवढी आहे किमत

samrt-jacket
आपल्या फोनकडे आपले अनेकदा लक्ष नसते, ज्यावेळी आपल्याला फोनची गरज लागते तेव्हा तुमच्या लक्षात येते की फोन घरीच विसरलो आहे किंवा अनेकदा आपण फोन बरोबर घेवून जातो आणि तेथेच विसरुन येतो. एक खास स्मार्ट जॅकेट तुमची हिच अडचण लक्षात घेवून तयार करण्यात आले आहे. हे जॅकेट स्मार्टफोन विसरल्यास त्याबाबत आठवण करुन देणार आहे.
samrt-jacket1
हे स्मार्ट जॅकेट गुगल आणि लेविस कंपन्यांनी एकत्र येत तयार केले असून हे ‘ऑलवेज टुगेदर’ मोडवर डिझाइन करण्यात आले आहे. ऑलवेज टुगेदर एक इलेक्ट्रिक अलर्ट असून तुम्ही यामध्ये तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणे जॅकेट आणि फोनमधील अंतर सेट करु शकतात. म्हणजेच तुम्ही घातलेल्या जॅकेट आणि फोनमधील अंतर जर जास्त झाले तर तुम्हाला अलर्ट मिळेल.
samrt-jacket2
दोन्ही प्रकारे हे अलर्ट काम करते. फोनवर एक नोटिफीकेशन यामध्ये येते तसेच जॅकेटमधील टॅग देखील चमकायला आणि व्हायब्रेट व्हायला सुरूवात होते. तुम्हाला याचा वापर करण्यासाठी तुमच्या स्मार्टफोनमध्ये Jacquard app असणे आवश्यक आहे. या जॅकेटची किंमत ३५० डॉलर म्हणजे जवळपास २५ हजार रुपये एवढी असणार आहे.

Leave a Comment