टांझानिया आणि केनियामधील आदिवासी लोक पितात चक्क जिवंत प्राण्यांचे रक्त

tribal
अनेक जमातींचे स्थान म्हणून आफ्रिकेला ओळखले जाते. वेगवेगळ्या आणि विचित्र परंपरा आणि प्रथा या जमातींच्या आहेत. मसाई ही यांच्यातीलच एक जमात आहे. त्यांची गुराखी आणि योद्धा म्हणून ओळख आहे. यांचे वास्तव्य टांझानिया आणि केनियाच्या भागात असते. आम्ही आज तुम्हाला यांच्याबाबतच्या काही आश्चर्यकारक गोष्टी सांगत आहोत.
tribal1
आपली संस्कृती आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळाजवळ राहत असल्यामुळे मसाई लोकप्रिय झाले आहेत. मुख्यतः मसाई हे मारा, सेरेनेगी आणि अंबोसेलीसारख्या ठिकाणाजवळ राहतात. त्यांची केनिया आणि टांझानियामध्ये संख्या जवळपास १० लाख आहे. लाल रंगाचे कपडे त्यांची ओळख आहे. त्याला शुका असे म्हणतात. मृत्युपश्तात दफन करण्याची प्रथा या समुदायात नाही. मृतदेहांना ते उघड्यावर सोडून देतात. मृतदेह दफन केल्याने जमीन खराब होत असल्याचा त्यांचा समज आहे.
tribal2
स्वतःचे नियम आणि कायदे या जमातीचे आहे. त्यांमध्ये त्यांच्या आयुष्यातील सर्व पैलुंचा समावेश आहे. मसाई समुदायात वृद्ध व्यक्ती हा समूहचा प्रमुख असतो आणि त्याचे निर्णय मानले जातात. भटके जीवन मसाई आदिवासी जगतात. कारण त्यांच्या जनावरांना चरण्यासाठी नवीन जागा मिळू शकेल. जनावरांची यांच्या जीवनात महत्वाची भूमिका आहे. कारण जनावरे मसाई आदिवासींच्या अन्नाचे साधने आहेत.

Leave a Comment