५०० अंकांनी गडगडला सेन्सेक्स

share-market
मुंबई – सोमवारी शेअर बाजारात एक्जिट पोल भाजप सरकारच्या विरोधात गेल्यामुळे मोठी घसरण दिसून आली. सकाळी सेन्सेक्स ४७८.५९ अंकानी घसरुन ३५,२०४.६६ वर सुरु झाला. तर १८५ अंकाची घसरण निफ्टीमध्येही झाली. १०,५०८.७० अंकावर निफ्टीची सुरुवात झाली. सेन्सेक्स सकाळी ९ वाजून ३५ मिनिटांनी ५७९ अंकानी घसरून ३५,०९३ वर तर १७७ अंकाची घसरण निफ्टीमध्ये होत १०,५१६ अंकावर गडगडला.

राजस्थानमध्ये भाजपकडून सत्ता जाईल तर मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसबरोबर अटीतटीची लढत होईल असा अंदाज शुक्रवारी आलेल्या एक्जिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. या तीन राज्यांबरोबरच तेलंगणा आणि मिझोराममध्ये झालेल्या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी होईल. दरम्यान, शेअर बाजाराने शुक्रवारी दिवसभर चांगली कामगिरी केली होती. दिवसाच्या अखेरीस सेन्सेक्स ३६१ अंकांच्या तेजीसह ३५,६७३ वर तर निफ्टी ९२ अंकाच्या तेजीसह १०,६९३ वर बंद झाला होता.

Leave a Comment