न्यूयॉर्क : तुम्ही एव्हाना ऊपरवाला जब भी देता है, छप्पर फाड के देता है’ ही म्हण ऐकलीच असेल. पण, ही म्हण प्रत्यक्षात अमेरिकेच्या मेरिलँडमध्ये राहणाऱ्या वेनेसा वार्डने अनुभवली आहे. भाजी विकत घेण्यासाठी वेनेसा जवळच्याच बाजारात गेली होती आणि ती अवघ्या २५ मिनिटांच्या आत करोडोंची मालकीण बनली होती. रस्त्यातच वेनेसाने एक लॉटरीचे तिकिट खरेदी केले. त्यादिवशी ती जणू काही आपल्या नशिबाची परिक्षाच घेत होती. तिने तिकीट घेतले आणि घरी परतली. तिला हे तिकीट स्क्रॅच केल्यानंतर धक्काच बसला. वेनेसाला या तिकीटामुळे २ लाख २५ हजार डॉलर्सची लॉटरी लागली होती.
भाजी घ्यायला गेली आणि करोडपती झाली
वेनेसा ही लॉटरी जिंकल्यानंतर खुपच खुश आहे. आपल्याला भाजी विकत घेण्यासाठी आपल्या वडिलांनी बाजारात पाठवले होते. येथेच स्पिन स्क्रॅच ऑफ तिकीट पाहिले आणि हे तिकीट सहजच खरेदी केले. पण आपले नशिबच या लॉटरीमुळे बदलल्याची प्रतिक्रिया वेनेसाने व्यक्त केली आहे. वेनेसाने यानंतर सर्वात अगोदर ‘वर्जिनिया लॉटरी’ला फोन केला आणि याबद्दल सूचना केली. ही रक्कम निवृत्तीनंतर वापरता यावी, म्हणून आपण सुरक्षित ठेवणार असल्याचे वेनेसाने म्हटले आहे. शिवाय डिज्स्ने वर्ल्ड फिरण्याची आपले अपूर्ण स्वप्नही वेनेसाला पूर्ण करायचे आहे.