हिरा हा मौल्यवान असतो हे काही आपल्याला नव्याने सांगायला नको. कारण अगदी लहान हिऱ्याची किंमतही कोट्यवधी रुपयांच्या घरात असू शकते. मग कधी असा विचार तुम्ही केला आहे का की, पूर्ण हिऱ्यांनी एखाद्या खऱ्या खुऱ्या विमानाला मढवले तर त्याची किंमत काय असेल. नाही ना… कारण कधीच असा विचार करण्याची गरजही पडली नसेल. पण तुम्हाला असा प्रश्न सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक फोटो पाहिल्यानंतर पडल्याशिवाय राहणार नाही.
हे आहे हिऱ्यांनी मढवलेल्या व्हायरल विमानामागील सत्य
Presenting the Emirates ‘Bling’ 777. Image created by Sara Shakeel 💎💎💎 pic.twitter.com/zDYnUZtIOS
— Emirates Airline (@emirates) December 4, 2018
सध्या सोशल मीडियावर एमिरात एअरलाइन्सच्या एका विमानाचा वर दिसणाऱ्या ट्विटमधला फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये असेलेले विमान हिऱ्यांनी मढलेले दिसत असल्यामुळे हिऱ्याचे विमान कंपनीने तयार केले की काय? असे वाटल्याशिवाय राहत नाही. पण त्या फोटोखालील कॅप्शन वाचल्यानंतर हा खरा फोटो नसून सारा शकील नावाच्या यूझरने तयार केलेला असल्याचे लक्षात येते. हा फोटो कंपनीने स्वतःच्या प्रमोशनसाठी वापरला आहे.