नवी दिल्ली – भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर ३ बाद १५१ धावांपर्यंत मजल मारली आणि १६६ धावांची महत्वपूर्ण आघाडी घेतली. ३२५ धावांवर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव आटोपल्यानंतर भारताकडून सलामीवीरांनी ६३ धावांची सुरुवात मिळवून दिली. मुरली विजय १८ तर लोकेश राहुल ४४ धावांवर बाद झाला. कोहली पुजाराने हे दोघे बाद झाल्यावर डाव सावरला. ३४ धावांवर कोहली बाद झाला. पण पुजारा ४० धावांवर नाबाद आहे. स्टार्क, हेजलवूड आणि लॉयन यांनी १-१ बळी टिपला.
कोहली-पुजाराने सावरला भारताचा डाव! दिवसअखेर १६६ धावांची आघाडी
त्याआधी, ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस धावसंख्या ही ७ बाद १९१ अशी होती. पावसाने तिसऱ्या दिवसाच्या खेळात दोन वेळा व्यत्यय आणल्यामुळे सामना सुरु होण्यासाठी विलंब झाला. या दरम्यान ऑस्ट्रेलियाचे फलंदाज आपल्या धावसंख्येत ४४ धावांची भर घालू शकले. ट्रेव्हिस हेडने अर्धशतकी (७२) खेळी करुन संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्याचे प्रयत्नही अपुरे पडले. ऑस्ट्रेलियाच्या तळातल्या फलंदाजांना मोहम्मद शमीने माघारी धाडत भारताला पहिल्या डावात १५ धावांची आघाडीवर घेतली. रविचंद्रन अश्विन आणि जसप्रीत बुमराहने ३-३, तर इशांत शर्मा आणि मोहम्मद शमीने २-२ बळी टिपले.