मेक्सिको- जगातील सर्वात लठ्ठ व्यक्ती असल्याचा विक्रम जुआन पेड्रो फ्रँको (३४) याने गमावला असून जुआनचे नाव गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमधून नाव वगळले गेल्यानंतर त्याला त्याचे वाईट वाटलेले नाही. उलट आनंद वाटला. बेरियाट्रिक सर्जरी करून गेल्या दोन वर्षात ५९५ किलो वजन असलेल्या जुआनने २९१ किलो वजन घटवले. त्याचे वजन आता ३०४ किलो आहे. आता अंथरुणावरून जुआन उठून चालू फिरू शकतो. त्याला आता आपले वजन १३८ किलो करायचे आहे. जुआनने सांगितले, एका आजारात ६ वर्षात त्याचे वजन दरवर्षी ९ किलोने वाढत होतेे.
सुरुवातीला तो ६ पावले चालले की, दमून बसत असे. पण तो आता १०० पावलापेक्षा जास्त चालतो. १७ व्या वर्षी अपघात झाला होता. तो यामुळे ६ वर्षे अंथरुणाला खिळून होता. जुआनवर मेक्सिकोच्या ग्वाडलहराच्या रुग्णालयात सर्जरी करण्यात आली. स्पेशल हायटेक रुग्णवाहिकेतून जुआनला रुग्णालयात आणण्यात आले. त्याच्यावर येथे उपचार सुरू आहेत. त्याला काही महिने दवाखान्यात राहावे लागणार आहे. आता त्याच्या स्नायूवर लक्ष देण्यात येणार आहे, असे डॉक्टरांनी सांगितले.