या सुंदर पोलिस महिलेकडून अटक होण्यासाठी लोक स्वतः होतात तयार

model
बर्लिन – आपले सौंदर्यच एका पोलीस अधिकाऱ्यासाठी त्रासदायक ठरत आहेत. जर्मनीच्या अॅड्रिनी कोलेसजर नावाच्या या महिला मॉडेल पोलिस ऑफिसर नावाने प्रसिद्ध झालेल्या अॅड्रिनीला आता पोलिस डिपार्टमेंटने इशारा दिला आहे. जर तिने सोशल मीडियावर फोटो अपलोड करणे बंद केले नाही, तर तिला नोकरी गमवावी लागेल असे सांगितले आहे. आपल्या सुंदर फोटोंनी इन्स्टाग्रामवर अॅड्रिनीने खळबळ माजवली होती. अॅड्रिनीचे जवळपास दोन वर्षात लाखो फॉलोअर्स बनले, तर लोक तिला सोशल मीडियावर मॅडम मला अटक करा असे म्हणू लागले होते.
model1
सर्वात जास्त वर्कआऊटचे फोटो अॅड्रिनी अपलोड करते. अनेकांना तिच्या सिक्स पॅकने प्रोत्साहीत केले आहे. पण हे पोलिस डिपार्टमेंटला आवडले नाही. तिला डिपार्टमेंटने स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, सोशल मीडिया बिकिनी फोटोज अपलोड करणे बंद करावे. एक तर पोलिसांत राहा अन्यथा इन्स्टाग्राम चालव, असे स्पष्ट सांगण्यात आले आहे. यावर विचार करण्यासाठी तिला ठरावीक वेळ देण्यात आला आहे. डिपार्टमेंटचे असे म्हणणे आहे की, अॅड्रिनीचे तिच्या कामावर लक्ष नाही.
model2
३४ वर्षांच्या अॅड्रिनीच्या लोकप्रियतेचा अंदाज दोन वर्षातच इन्स्टाग्रामवर तिच्या वाढलेल्या फॉलोअर्सवरून लावता येऊ शकतो. तिच्या इन्स्टाग्राम फॅन्सचा आकडा दोन वर्षात ९० हजारांवरून ५ लाखांच्या पुढे गेला आहे. अॅड्रिनीचे फोटो आणि फिटनेस लोकांना प्रचंड आवडते. अनेकांनी तिला तिच्या हातून तुरुंगात जायला तयार असल्याचे म्हटले आहे. सर्वात आधी अॅड्रिनी जेव्हा इंटरनेट सेंसेशन बनली होती तेव्हा ती म्हणाली होती की, असे फोटो पोस्ट करण्यावर तिच्या बॉसना काहीही हरकत नव्हती. पण तिचे सौंदर्य आता जॉबसाठी धोकादायक ठरत आहे.