नेरोबी – २९ वर्षांपासून आफ्रीकेच्या एका गावात पुरुषांना राहण्यास बंदी आहे. पण येथे असे असूनही येथील महिलांना गर्भधारणा होते. आफ्रीकेच्या यूमोजा गावासंबंधी अनेक दिवसांपासून विविध गोष्टी व्हायरल झालेल्या आहेत. पण आम्ही आज तुम्हाला या गावासंदर्भातील खरी गोष्ट सांगणार आहोत. पुरुषांना आफ्रीकेच्या घनदाट जंगलामध्ये वसलेल्या या गावाच्या आसपास फिरण्यासही बंदी असून ब्रिटीश जवानांनी १९९०मध्ये येथील १५ महिलांवर बलात्कार केला होता. हे गाव नंतर महिलांच्या निवासासाठी तयार करण्यात आले होते. तेव्हापासून येथे वास्तव्यासाठी बलात्कार, बाल विवाह, घरेलू हिंसा आणि खतना यांसारख्या हिंसा पीडित महिला येत आहेत. यामुळेच पुरुषांना या गावात येण्यास बंदी घातली आहे. आफ्रीकेतील सिंगल-सेक्स कम्युनिटी असणारे हे एकमेव गाव आहे.
पुरुषांची या गावात लोकसंख्याच नाही तर मग या महिला आपोआप गर्भवती कसे काय होतात? हा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होतो. यामागे दोन तर्क आहेत. पहिला असा की, येथे राहण्यासाठी आलेल्या पीडित महिला अगोदरच गर्भवती होत्या, ज्यांच्याविषयी ऐकून लोकांनी त्या आपोआप प्रेग्नंट होण्याची अफवा उडवली. तर दुसरा तर्क असा आहे की, पुरुषांना या गावात बंदी असेल पण महिलांना दुसऱ्या गावात आणि शहरांमध्ये जाण्याची पाबंदी नसल्यामुळे दुसऱ्या गावातील आवडत्या पुरूषाबरोबर संबंध ठेवून प्रेग्नंट होतात. पण अद्यापही हे खरे आहे की नाही हे स्पष्ट झालेले नाही. या महिलांना चोरून आजुबाजूच्या गावातील लोक दुसऱ्या गावात घेऊन जात असल्याचे बोलत आहेत.
१५महिलांसाठी तयार करण्यात आलेल्या या छोट्याशा गावाचा विस्तार झाला आहे. मिडीया रिपोर्ट्सनुसार या गावात आता २५० महिला राहत आहेत. यातील अनेक महिलांनी मुलांना जन्म दिला आहे. चर्चेचा विषय ठरलेल्या या गावात पर्यटक भेट देत आहेत. या गावात महिलांनी प्रायमरी स्कूल, कल्चरल सेंटर आणि नॅशनल पार्क उभारले आहे. येथे पर्यटनासाठी त्यांनी मोहीम सुरू केली आहे. याठिकाणी अनेक पर्यटक भेट देतात. त्यासाठी पर्यटकांकडून शुल्क आकारले जात आहे. पर्यटनातून येणारा पैसा गावाच्या विकासासाठी खर्च केला जातो. पण येथे मुक्कामी थांबण्यासाठी पर्यटकांना मनाई आहे.