देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी डॉ. कृष्णमूर्ती सुब्रमण्यन यांची नियुक्ती

Krishnamurthy-Subramanian
नवी दिल्ली: देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी डॉ. कृष्णमूर्ती सुब्रमण्यन यांची नियुक्ती करण्यात आली. ते या पदाचा पुढील तीन वर्षांसाठी कार्यभार सांभाळतील. हे पद अरविंद सुब्रमण्यन यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झाले होते. सरकारने या पदासाठी ३० जून रोजी अर्ज मागवले होते. या अर्जांची छाननी केल्यानंतर मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (एसीसी) डॉ. कृष्णमूर्ती सुब्रमण्यन यांचे नाव निश्चित केले.

सध्या हैदराबादच्या इंडियन स्कूल ऑफ बिझनेसमध्ये डॉ. कृष्णमूर्ती सुब्रमण्यन हे अॅनालिटिकल फायनान्स विभागाचे कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहेत. शिकागो-बुथ स्कूलमधून त्यांनी पीएचडी केली आहे. तसेच आयआयटी व आयआयएम या देशातील अग्रगण्य संस्थांमध्येही त्यांचे शिक्षण झाले आहे. डॉ. सुब्रमण्यन यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर बँकिंग, कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि आर्थिक धोरणांचे तज्ज्ञ म्हणून लौकिक आहे.

Leave a Comment