मुख्यमंत्री सहाय्यता निधीला साई संस्थांनकडून ५० कोटींची मदत!

saibaba
अहमदनगर : मुख्यमंत्री सहायता निधीला शिर्डीच्या साईबाबा संस्थानकडून ५० कोटी रुपये मिळणार आहेत. हा निर्णय साईबाबा संस्थान व्यवस्थापन समितीच्या सभेत घेण्यात आला असून राज्य सरकारनेही याबाबत अध्यादेश जारी केला आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणगी देण्याचे आवाहन राज्यातील जनतेला अर्थ सहाय्य व्हावे, यासाठी करण्यात आले होते. शिर्डीच्या साई संस्थांनने या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ५० कोटी रुपये अर्थसहाय्य म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे.

साई संस्थानने याबाबत सरकारला ५ नोव्हेंबर रोजी पत्र पाठवून हा प्रस्ताव पाठवला होता. त्यानंतर शासन निर्णयाद्वारे ५० कोटी रुपयांचा निधी अर्थसहाय्य म्हणून देण्यास मान्यता दिली.

Leave a Comment