गूगलचे ‘Allo’ अॅप बंद होणार

google
मुंबई – युझर्सना नवनवीन सेवा देण्याचा मानस गूगलचा असतो. त्यात आता एक मेसेंजर अॅप बंद करण्याचा निर्णय गूगलने घेतला आहे. या अॅप्लिकेशनचे नाव गूगल Allo असे आहे. युझर्सकडून या अॅपला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

मार्च २०१९ पर्यंत Allo अॅप सुरु असेल. युजर्स तोपर्यंत अॅपवरील मेसेजेसचा बॅकअप घेऊ शकतात, अशी माहिती गूगलने दिली. मशिन लर्निंगवर आधारित असलेले फिचर्स आणि गूगल असिस्टंटला मेसेंजर अॅपमध्येच इनबिल्ट करणे, या बाबी आम्ही, Allo अॅपद्वारे शिकलो, असे गुगलने सांगितले. Allo अॅपमध्ये यंदा एप्रिल महिन्यापासूनच गुंतवणूक करणे बंद केले होते. अनेक फिचर्स या अॅपमध्ये उपलब्ध होते. पण तरीही Allo ला व्हॉटसअॅप समोर अपेक्षित कामगिरी करता आली नाही.

या मेसेंजर अॅपमध्ये इतर मेसेंजर अॅपप्रमाणेकॉलिंगची सोय नसल्याने युजर्सनी या अॅपकडे दुर्लक्ष केले. या अॅपच्या माध्यामातून युजर्सना फोटो आणि स्टीकर्स पाठवण्याची सोय होती. पण या अॅपद्वारे एखादी फाईल किंवा डॉक्युमेंट पाठवण्यासाठी सोय नसल्याने इतर मेसेंजरच्या तुलनेत हे अॅप मागे पडले. इतर अॅपच्या तुलनेत Allo हाताळण्यासाठी किचकटही होते.

हे अॅप बंद होत असल्याने आपल्या डेटाची युजर्सना गरज असते. मार्च २०१९पर्यंत युजर्स डेटा बॅकअॅप घेऊ शकतात. बॅकअॅप घेण्याची प्रकिया फार सोपी आहे. चॅट हिस्ट्रीचा बॅकअॅप घेण्यासाठी Allo अॅपच्या सेटींग मध्ये जाऊन चॅट ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर मेसेज बॅकअप आणि मेसेज सोबतच फोटो आणि व्हिडीओ बॅकअॅप असे दोन पर्याय येतील. पहिला ऑप्शन निवडल्यावर फक्त मेसेजचा बॅकअॅप डेटा मिळेल. तर दुसरा पर्याय सेलेक्ट केल्यावर युजर्सना त्यांचा सर्व डेटा मिळेल.

Leave a Comment