भिडे यांना कुठल्याही शर्तीविना जामीन मंजूर

sambhaji-bhide
नाशिक – नाशिक जिल्हा न्यायालयात संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत दाखल प्रकरणावर आज सुनावणी करण्यात आली. त्यांना कुठल्याही शर्तीविना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

माझ्या बागेतील आंबा खाऊन मुले होतात, असे वादग्रस्त वक्तव्य भिडे यांनी केले होते. त्यांच्यावर त्यामुळे लिंग निदान चाचणी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. नाशिक जिल्हा न्यायालयात यावर सुनावणी घेण्यात आली. भिडे यापूर्वी झालेल्या ३ सुनावणींना गैरहजर होते. पण त्यांनी आजच्या सुनावणीस हजेरी लावली. न्यायालयाने आज त्यांचा १५ हजाराच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला, अशी माहिती वकील अविनाश भिडे यांनी दिली.

Leave a Comment