पुणेकरांना लवकरच मिळणार दुर्मिळ धूमकेतू पाहण्याची संधी

comet
पुणे – दुर्मिळ धूमकेतू बघण्याची संधी पुणेकरांना लवकरच मिळणार असून ‘४६ पी वेरेतनन’ हा धूमकेतू डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात अवकाशात दिसणार आहे. साध्या डोळ्यांनीही गुरू ग्रह कुलातील हा धूमकेतू बघायला मिळणार आहे.

नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यानचा काळ आकाश दर्शनासाठी अतिशय सुंदर असतो. या महिन्यांचे वैशिष्ट्य आकाशात दिसणारे तारे आणि ताऱ्यांच्या पार्श्वभूमीवर फिरणारे ग्रह हे असते. आपल्याला डिसेंबरमध्ये एका छोट्याशा धूमकेतूचे दर्शन घेता येणार आहे. हा धूमकेतू आपल्याला या महिन्यात बराच काळ दिसत राहील. एप्रिल १९७२ व फेब्रुवारी १९८४ या वर्षी तो गुरू ग्रहाच्या खूप जवळ गेला व परत तिथून निसटल्यानंतर त्याच्या कक्षेवर गुरूच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम दिसून आला. त्यामुळे त्याच्या कक्षा परिभ्रमणाचा कालावधी साधारणपणे सहा वर्षे, सात महिने व पाच वर्षे, पाच महिन्यांनी असा बदलला. अत्यंत अंधाऱ्या जागेवरूनही हा धूमकेतू डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात दिसू शकेल.

Leave a Comment