फेसबूकच्या कर्मचाऱ्यांवर दुसऱ्या ठिकाणी नोकरी शोधण्याची वेळ

facebook
मुंबई : दिवसेंदिवस फेसबूकच्या लोकप्रियतेत वाढ होत असून आपल्या युझर्सना नवनवीन सुविधा देण्याच्या प्रयत्नात फेसबूक असते. फेसबुकवर नुकत्याच व्हिडीओतून कमाई करण्याची संधी फेसबुकने दिली. फेसबूक आपल्या माध्यमातून अनेकांना रोजगार देत आहे, पण फेसबूकच्या कर्मचाऱ्यांवर दुसऱ्या ठिकाणी नोकरी शोधण्याची वेळ आली आहे.

मागील काही महिन्यात फेसबूकसोबत अप्रिय घटना घडल्या. फेसबूक त्यात डेटा लीक प्रकरण घडल्याने, कंपनीच्या शेअर्सच्या किंमती कमी घसरल्यामुळे दुसऱ्या ठिकाणी काम मिळते का?याची चाचपणी फेसबूकचे कर्मचारी करत आहेत.

यासंदर्भात सीएनबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, आपल्या माजी फेसबूक कर्मचाऱ्यांना फेसबूकचे कर्मचारी नोकरी शोधण्यासाठी सांगत आहेत. आमच्यासाठी काम शोधा, असे फोन कॉल आम्हाला आमचे फेसबूकमध्य़े काम करणारे मित्र करतात, अशी माहिती फेसबूकच्या माजी कर्मचाऱ्यांनी सीएनबीसीला दिली. वृत्तानुसार, नोकरी सोडणे ही बाब इतर कंपन्यासाठी सामान्य आहे, पण फेसबूकसाठी नाही. कारण फेसबूकसाठी सिलिकॉन व्हॅलीत काम करणे प्रतिष्ठेचे समजले जाते. फेसबूकच्या अंतर्गत सर्वेक्षणाची माहिती देणाऱ्या ‘वॉल स्ट्रीट जनर्ल’च्या अहवालानुसार ५२ टक्के कर्मचारी हे फेसबूकच्या भविष्याबद्दल अनुकूल आहेत.

Leave a Comment