सर्वात वयोवृद्ध युट्यूबर मस्तनम्मा यांचे निधन

mastanamma
मुंबई : दर दिवशी असंख्य व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. बऱ्याच व्हिडिओंचा लाइक्स, शेअर्स, कमेंट्सच्या या दुनियेत विसरही पडतो. पण, त्यातही काही युट्यूबर प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप पाडण्यात यशस्वी ठरतात. मस्तनम्मा अशाच युट्यूबर्सच्या यादीतील एक नाव आहे.

सर्वात वयोवृद्ध युट्यूबर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंद्रीकेशरी मस्तनम्मा यांचे वयाच्या १०७ व्या वर्षी निधन झाले. आपल्या पाककलेची सुरेख आणि तितकीच सोपी शैली सर्वांसमोर ठेवत मुळच्या आंध्रप्रदेशच्या असणाऱ्या मस्तनम्मा यांनी ही कला साऱ्या जगापर्यंत पोहोचवली.

‘एग डोसा’ म्हणू नका किंवा मग साधी सोपी भाजी म्हणू नका. हाताशी उपलब्ध साधन आणि सामग्रीचा वापर करत चवदार पदार्थ बनवणाऱ्या या आजीबाईंचा उत्साह तरुणाईलाही लाजवेल असाच होता. मुख्य म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर अमुक एक पदार्थ बनवतेवेळी असणारा आनंद, उत्साह आणि शेवटी तो पदार्थ पूर्ण झाल्यानंतरच्या त्यांच्या चेहऱ्यावरच्या भावना या शब्दांत व्यक्त करता येणे निव्वळ अशक्य असून मस्तनम्मा आज आपल्यात नसल्या तरीही त्यांच्या व्हिडिओ आणि पाककौशल्याच्या माध्यमातून त्या नेहमीच सर्वांसोबत असतील, असे म्हणत या लाडक्या आजींना नेटकऱ्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

Leave a Comment