एटीएममधून स्मार्टफोनच्या मदतीने काढा पैसे !

NCR
मुंबई: आता डेबिटकार्डची गरज एटीएममधून पैसे काढण्यासाठी भासणार नाही. तुम्ही बॅंक खात्यामधून डेबिटकार्ड नसतानाही पैसे काढू शकणार आहेत. तुमच्या स्मार्टफोनचा कॅमेरा पैसे काढण्यासाठी मदतगार ठरणार आहे. एटीएममधून पैसे काढण्यासाठी युनिफाईड पेमेंट इंटरफेस (UPI) अॅनेबल्ड अॅपचा उपयोग केला जाणार आहे. लोकांना नवीन तंत्रज्ञान पैसे काढण्यास मदत करणार आहे.

तुम्हाला एटीएममधून पैसे काढण्यासाठी एटीएम मशीनवरील क्युआरकोड स्कॅन करावा लागणार आहे. याबाबत टाईम्‍स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, बॅंकेला एटीएमची सेवा उपलब्ध करुन देणारी एजीएस (AGS) कंपनी आहे. यूपीआय अॅनेबल्ड अॅपने क्युआरकोड स्कॅन करता येणार आहे. जसे आपण खरेदी केल्यावर पेमेंट करतो, त्याचप्रकारे एटीएममधील क्यूआर कोड स्कॅन केल्यावर तुम्हाला कॅश मिळणार आहे.

नॅशनल पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ची मंजुरी ही सेवा सुरु करण्यासाठी मिळणे गरजेचे आहे. एटीएम नेटवर्कला नियंत्रण करण्यासाठी एनपीसीआय ही जबाबदार आहे. एजीएस टेक्नोलॅाजीचे सीएमडी रवी बी गोयल यांनी सांगितले, नवीन तंत्रज्ञानाच्या विषयात ज्या बॅंकेसोबत चर्चा केली आहे, त्या खूप उत्साहित आहेत. तसेच ते म्हणाले यूपीआय आणि एटीएम नेटवर्क एकाच आर्थिक स्विचवर काम करतात. यूपीआय एक अधिक सुरक्षित व्यवहार मंच आहे.

एजीएस टेक्‍नोलॉजीच्या ग्रुपचे चीफ महेश पटेलने रिपोर्टमध्ये सांगितले की, बॅंकेला यासाठी त्याच्या हार्डवेअरमधील काहीच बदल करण्याची गरज लागणार नाही. पण सॅाफ्टवेअरमधील बदल बॅंकेला करण्याची आवश्यकता आहे. काही बँकेत कार्डलेस एटीएम विड्रोल सुविधा प्रदान करतात. परंतु ही सेवा त्यापेक्षा अधिक सोपी आणि जलद ठरणार आहे.

Leave a Comment