कसोटी क्रिकेटमधून पाकिस्तानी फलंदाजाची अचानक निवृत्ती

mohammad-hafeez
अबुधाबी – मंगळवारी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा पाकिस्तान क्रिकेट संघातील अनुभवी फलंदाज मोहम्मद हाफीजने केली असून २० ऑगस्ट २००३ साली बांगलादेशविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये हाफीजने पदार्पण केले होते. त्याने १५ वर्षाच्या प्रदिर्घ कारकिर्दीनंतर निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. तो न्यूझीलंडविरुद्ध चालू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर कसोटी क्रिकेटला अलविदा करणार आहे.

याबाबत हाफीज म्हणाला, कसोटी क्रिकेटमधून मी निवृत्त होत असून माझ्यासाठी हा निर्णय घेणे कठीण होते. पण मला आनंद आहे, कारण माझ्या कारकिर्दीत मी खूप मेहनत घेतली. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटवर लक्ष देण्यासाठी हीच योग्य वेळ असल्याचे सांगत १५ वर्ष खेळण्याची संधी दिल्याबद्दल त्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे आभार मानले.

पाकिस्तानकडून आतापर्यंत मोहम्मद हाफीजने ५५ कसोटी सामने खेळताना १०४ डावांत ३७.९६ च्या सरासरीने ३ हजार ६४४ धावा केल्या आहेत. यात त्याने १० शतके आणि १२ अर्धशतके झळकावली आहेत. मागील महिन्यांत ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतकी खेळी केल्यानंतर मागच्या ७ डावांत हाफीजला केवळ ६६ धावाच करता आल्या होत्या.

Leave a Comment