नवी दिल्ली – आयपीएलमधील दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचे नाव बदलण्यात आले असून आयपीएलच्या १२ व्या हंगामापासून दिल्ली डेअरडेव्हिल्स हा संघ ‘दिल्ली कॅपिटल्स’ म्हणून ओळखला जाणार आहे. दिल्लीच्या संघ मालकांकडून नावात बदल केल्याचा निर्णय मंगळवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला आहे.
आयपीएलच्या १२ व्या हंगामात ‘दिल्ली डेअरडेव्हिल्स’च्या जागी ‘दिल्ली कॅपिटल्स’
Dilliwasiyon, say hello to Delhi Capitals!#ThisIsNewDelhi pic.twitter.com/KFW8f3GIP7
— Delhi Capitals (@DelhiCapitals) December 4, 2018
दिल्लीने आयपीएलच्या लिलावाआधी खेळाडूंची कामगिरी लक्षात घेता संघातून गंभीर, मॅक्सवेल, शमी आणि डॅनियल यांना संघातून मुक्त केले आहे. श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ आणि रिषभ पंत या युवा खेळाडूंवर विश्वास ठेवत दिल्लीने त्यांना संघात कायम ठेवले आहे. संघाने काही दिवसांपूर्वी विजय शंकर, अभिषेक शर्मा आणि शाहबाज नदीम या ३ खेळाडूंना बदल्यात सनरायझर्स हैदराबादकडून शिखर धवनला संघात घेतले होते.