जयपूरमध्ये १८ डिसेंबरला आयपीएल २०१९ साठी लिलाव

iplauction
आयपीएल २०१९ पूर्वी केले जाणारे खेळाडूंचे लिलाव १८ डिसेंबरला जयपूर येथे आयोजित केले गेले असून हा लिलाव एक दिवसाचा आहे. हा लिलाव बंगलोर येथे होणार होता मात्र आता तो जयपूर मध्ये होत असल्याचे बीसीसीआयने सोमवारी जाहीर केले आहे. या लिलावात ७० खेळाडूना स्थान मिळाले असून त्यातील ५० भारतीय तर २० परदेशी खेळाडू आहेत.

या लिलावात ८ टीम बोलीसाठी एकूण १४५ कोटी २५ लाखाची रक्कम लावणार आहेत. गेल्या महिन्यात या टीमनी ज्या खेळाडूना टीमने पुन्हा संधी दिली आहे त्याची नावे जाहीर केली आहेत तसेच ज्यांना टीममधून बाहेर काढले गेले आहे त्यांचीही नावे जाहीर केली आहेत. पंजाब इलेव्हनने युवराज, दिल्ली डेअरडेव्हिल्सने गौतम गंभीर, राजस्थान रॉयलने जयदेव उनाडकर, सनरायझर्स हैद्राबादने जखमी विकेट कीपर रिद्धीमान साहा यांना रिलीज केले आहे.

आयपीएल सामने आणि देशातील सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखा एकत्र येत असतील तर हे सामने देशाबाहेर घेतले जातील असेही सूचित केले गेले आहे.

Leave a Comment