तुर्कस्तानातील हे मंदिर आहे नरकाचा दरवाजा

hell1
अनेक देशातील अनेक मंदिरांतील रहस्ये आणि कहाण्या आपण खूपवेळा ऐकतो, वाचतो. मात्र एखाद्या मंदिराला नरकाचा दरवाजा असे म्हटले जात असेल अशी कल्पना आपण करू शकत नाही. तुर्कस्थानातील हिरापोलीस येथे असलेल्या एका खूप प्राचीन मंदिराला मात्र नरकाचा दरवाजा म्हणून ओळखले जाते. या मंदिराजवळच्या गुहेत जाणारा माणूसच काय पण पशु पक्षीहि जिवंत परतत नाहीत असा इतिहास आहे. गेली अनेक वर्षे या मंदिर गुहेत रहस्यमय मृत्यू होत असून ते मंदिरातील युनानी देवतेच्या विषारी श्वासामुळे होतात असे सांगितले जाते.

hell
अगदी ग्रीक आणि रोमन काळातही या मंदिरात जाणाऱ्या लोकांचा शिरच्छेद केला जात असे. मरणाच्या भयाने त्यावेळीही येथे कुणी जात नसे. या मंदिर परिसराचा वैज्ञानिकांनी शोध घेतला तेव्हा मंदिराजवळच्या गुहेतून प्रचंड प्रमाणात कार्बन डाय ऑक्साईड वायू बाहेर पडत असल्याने त्याचा संपर्कात आल्याने माणसे, प्राणी पक्षी मरत असावेत असा निष्कर्ष काढला गेला. जर्मन डूडसबर्ग इसेन विद्यापीठातील प्रोफेसर हार्डी पाफांज यांनी हा शोध लावला.

hell2
त्यांच्या मते या गुहेतून पृथ्वीच्या अंतर्भागातील विषारी वायू बाहेर पडत असून त्यात कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण ९१ टक्के आहे. त्यामुळे या वायूच्या नुसत्या वाफेनेच पक्षी पशु मरत असावेत. मात्र येथील अन्य पर्यटन स्थळांना भेट देणारे लोक आजही या गुहेकडे जाण्यास तयार होत नाहीत ते त्याच्या मागे असलेल्या मरणाच्या भीतीमुळेच.

Leave a Comment