२०२२ पर्यंत जगात ६० टक्के इंटरनेट युजर्स असणार भारतीय

netusers
सिस्को व्हिज्युअल नेट्वर्किंग इंडेक्सने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालानुसार भारतात २०२२ पर्यंत स्मार्टफोन युजर्सची संख्या ८२.९ कोटींवर जाणार असून जगात इंटरनेट युजर्सच्या एकूण संख्येत भारतीयांचे प्रमाण ६० टक्के असणार आहे. २०१७ मध्ये भारतात स्मार्टफोन युजर्सची संख्या ४० कोटी होती. त्याचबरोबर सध्या १७ टक्के असलेला इंटरनेट ट्रॅफिक २०२२ पर्यंत ४४ टक्क्यांवर जाईल असेही या अहवालात म्हटले गेले आहे. याच काळात संगणकावरचा इंटरनेट ट्रॅफिक १९ टक्क्यावर येईल असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.

गेल्या वर्षात भारतात इंटरनेट युजर्सची संख्या ४० कोटी असून ती ८४ कोटींवर जाणार आहे. याचाच अर्थ जगातील एकूण इंटरनेट युजर्स मध्ये ६० टक्के वाटा भारतीयांचा असेल. जगात येत्या ४ वर्षात मोबाईल इंटरनेटचा वेग दुप्पट होणार असून सध्या हा वेग सरासरी १३.२ एमबीपी आहे तो २८.५ वर जाईल. सर्वाधिक वेग प.युरोप मध्ये ५०.५ एमबीपी असेल. ग्लोबल फिक्स ब्रॉडबँड वेग याच काळात ७५.४ तर वायफाय चा हाच वेग २४ एमबीपी वरून ५४ एमबीपी वर जाईल असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Comment