या देशात पुरुष आहेत महिलांचे गुलाम

kingdom
जगभरात आपण महिलांवर पुरुषांकडून होत असलेल्या अत्याचाराच्या बातम्या नेहमीच ऐकायला मिळतात. पुरुष महिलांना कसे गुलामासारखे वागवितात याच्या कहाण्याही असंख्य आहेत. मात्र जगात एक देश असाही आहे जेथे पुरुषांना महिला गुलामाप्रमाणे वागवितात आणि त्यामुळे हा देश पुरुषांसाठी नरक मानला जातो. या देशाचे नाव वर्ल्ड किंगडम असे असून झेक रिपब्लिकचा तो एक भाग आहे. अर्थात या देशाला अन्य कोणत्याही देशाने स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिलेली नाही.

साधारण साडेसात एकर परिसरात हा देश पसरला आहे आणि येथे ऐशोआरामाच्या सर्व सुविधा आहेत पण त्या फक्त महिलांसाठी आहेत. स्विमिंग पूल, नाईट क्लब मध्ये पुरुष महिलेच्या परवानगी नंतर जाऊ शकतात. येथील मुख्य इमारत राणी महाल नावाने ओळखली जाते आणि राणीचे नाव आहे पॅट्रीशिया पहिली. या राणीचे या देशावर बेबंद राज्य आहे आणि विशेष म्हणजे या राणीचा चेहरा आजपर्यंत बाहेरच्या जगाला दिसलेला नाही.

या राणीच्या राज्यात पुरुषांना मोकळे भटकणे, मनमर्जी जगणे शक्य नाही. राणी पुरुषाच्या पाठीचा सोफा करून त्यावर बसते. पुरुष मालकिणीने सांगितले तरच खुर्चीवर बसू शकतात. त्यांना दारू प्यायची असेल तर अगोदर मालकिणीच्या पायावर घालावी लागते. कोणतेच काम पुरुष येथे मालकिणीच्या परवानगीशिवाय करू शकत नाहीत आणि हा नियम मोडला तर जबरदस्त शिक्षा त्यांना भोगावी लागते.

या देशाचे नागरिकत्व मिळण्यासाठी महिलांमध्ये योग्यता हवी. म्हणजे देशात येताना किमान एक पुरुष नोकर त्यांच्यासोबत हवा आणि तो सर्व नियम पाळणारा हवा. संबंधित महिलेला अगोदर पाच दिवस राणीच्या महालात राहावे लागते आणि मग योग्य वाटल्यास नागरिकत्व दिले जाते.

Leave a Comment