पहिल्या इंजिनरहित टी १८ रेल्वेने केले वेगाचे रेकॉर्ड

t18
भारताच्या पहिल्या इंजिनरहित टी १८ रेल्वेगाडीने ट्रायल रन मध्येच स्पीडचे नवे रेकॉर्ड नोंदविले आहे. या गाडीने ताशी १८० किमीचा वेग घेऊन देशातील सर्वाधिक वेगाने धावणारी गाडी असे रेकॉर्ड केले. या रेल्वेचा टॉप स्पीड ताशी २२० किमी पर्यत पोहोचू शकेल असे सांगितले जात आहे. रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी या संदर्भातली माहिती ट्विटरवर शेअर केली आहे.

या गाड्या ३० वर्षे जुन्या शताब्दी एक्स्प्रेसची जागा घेणार आहेत. या रेल्वेमुळे प्रवाशांना प्रवासाचा नवा अनुभव मिळेल. टी १८ रेल्वे सर्वप्रथम २८ ऑक्टोबरला रुळांवर धावली. हि रेल्वे पूर्ण स्वदेशी आहे. अन्य ट्रेनप्रमाणे डबे बदलणे, इंजिन लावणे या रेल्वेला करावे लागत नाही. या गाडीचा सर्व भाग एखाद्या सेट प्रमाणे काम करतो म्हणून तिल्स सेट नावाने ओळखले जाते. चेन्नई येथील कारखान्यात हि रेल्वे तयार केली गेली असून ती २०१८ मध्ये तयार झाल्याने तिला टी १८ असे नाव दिले गेले आहे.

या गाडीला १६ बोगी असून त्यातील दोन एस्क्ल्युझीव आहेत. गाडीची बांधणी अल्युमिनियमची असल्याने ती वजनाला हलकी आहे. यामुळे वेगात असतानाही गरज पडल्यास ब्रेक लावून ती त्वरित थांबविणे अथवा पुन्हा वेग वाढविणे सहज शक्य होते. या गाडीत सीसीटीव्ही, कॅमेरे लावले गेले असून जीपीएस आधारित प्रवासी सूचना प्रणाली वापरली गेली आहे.

Leave a Comment