साईबाबानी महाराष्ट्र सरकारला पुरविले बिनव्याजी कर्ज

shirdy
दुष्काळग्रस्त आणि आर्थिक तंगीचा सामना करत असलेल्या महाराष्ट्राच्या मदतीला साक्षात शिर्डीचे साईबाबा आले आहेत. दीर्घकाळ रेंगाळलेला आणि नगर जिल्यातील पाणी संकटावर तरणोपाय ठरणाऱ्या निळवंडे सिंचन प्रकल्पासाठी शिर्डी साई संस्थान ५०० कोटी रुपयांचे बिनव्याजी तसेच बिना मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणार आहे. या संदर्भात संस्थानाने मांडलेल्या प्रस्तावाला शनिवारी सरकारने मान्यता दिली असल्याचे समजते. कोणत्याची खासगी संस्थेने सरकारला इतक्या मोठ्या रकमेचे बिनव्याजी कर्ज देण्याची हि पहिलीच वेळ आहे.

वास्तविक निळवंडे सिंचन प्रकल्प पुरा करण्यासाठी काही दिवसापूर्वीच शिर्डी संस्थानाने बिनव्याजी कर्ज देण्याचा प्रस्ताव फडणवीस सरकारपुढे मांडला होता. मात्र त्यावेळी सरकारने तो मान्य केला नव्हता. गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळ हे काम करत असून त्यासाठी १२०० कोटी रु. निधी मंजूर केला गेला आहे. त्यातील ३०० कोटींची तरतूद या वर्षात तर ४०० कोटींची तरतूद पुढील वर्षात सरकारने केली आहे. बाकी ५०० कोटी शिर्डी संस्थानने देण्याची तयारी दाखविली आहे. हा प्रकल्प त्यामुळे दोन वर्षात पूर्ण होऊ शकेल असे सांगितले जात आहे. या प्रकल्पाचा फायदा शिर्डीलाही मिळणार आहे. शिर्डी संस्थांचे अध्यक्ष सुरेश हावरे हे भाजपशी संबंधित आहेत.

Leave a Comment