मोदींना फिफाची जर्सी भेट

jersy
जी २० शिखर परिषदेसाठी आर्जेन्टिनातील बृनोसला दिलेल्या भेटीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फिफाचे अध्यक्ष जिआनी इंफेन्तिनो यांनी निळ्या रंगाची फुटबॉल जर्सी भेट म्हणून दिली. शिखर परिषदेत जगभरातील बड्या नेत्यांच्या भेटी घेत असतानाच मोदी आणि इंफेन्तिनो यांची भेट झाली होती. या संदर्भात मोदिनी ट्विटरवर या जर्सीचा फोटो शेअर केला आहे. या जर्सीवर जी २० आणि मोदी असे छापले गेले आहे.

मोदी या जर्सी भेटीविषयी लिहितात, आर्जेन्टिना मध्ये आल्यावर फुटबॉलचा विचार न करणे अशक्य आहे. आर्जेन्टिनाचे फुटबॉलपटू भारतात खूप लोकप्रिय आहेत, जर्सी भेटीबद्दल धन्यवाद. भारतात फुटबॉलचे लाखो प्रशंसक आहेत आणि दिअगो मॅरेडोनाच्या नावावरून आमच्या भाषेत म्हणी तयार झाल्या आहेत.

Leave a Comment