आयपीएस भाग्यश्री नवटके यांच्या व्हायरल क्लिपचा तपास एसीपीकडे

IPS
बीड – दलित समाजाबाबत पोलीस उपविभागीय अधिकारी भाग्यश्री नवटके यांनी अवमानकारक शब्द वापरले असल्याची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. दलित नेते बाबुराव पोटभरे यांनी याबाबत पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केल्यानंतर या प्रकरणाचा तपास आता बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

जे माझ्याकडे अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी येतात मी त्यांनाच जास्त मारते, २१ दलितांना आतापर्यंत फोडून काढले आहे, अशा बेताल वक्तव्याची एक व्हिडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर दलित समाजाकडून त्याच्या वक्तव्याचे निषेध व्यक्त करण्यात येत आहे. या विरोधात आलेल्या तक्रारीनुसार पोलिसांकडून प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. या क्लिप वरून भाग्यश्री नवटके यांच्या बाबत आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. ही क्लिप नेमकी आली कुठून, व्हायरल झालेली क्लिपमधील आवाज भाग्यश्री नवटके यांचाच आहे का? याबाबतची चौकशी करण्यात येत आहे.

सध्या भाग्यश्री नवटके यांच्या ‘त्या’ क्लिपची सत्यता पडताळण्याचे सुरू आहे. योग्य ती कारवाई प्रकरणाच्या चौकशीनंतर करण्यात येईल, असा विश्वास अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे यांनी वर्तवला आहे.

Leave a Comment