कोल्हापूर – कोल्हापूर एसआयटीने चौकशीसाठी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी भरत कुरणे याला ताब्यात घेतले असून भरत कुरणेला यापूर्वी ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणीही अटक झालेली आहे.
कोल्हापूर एसआयटीच्या ताब्यात गोविंद पानसरे यांचा संशयित मारेकरी
कोल्हापूर पोलिसांच्या विशेष तपास पथकाने भरत कुरणेला बेंगळुरू पोलिसांकडून कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातही सहभाग असल्याने ताब्यात घेतले आहे. भरत कुरणेला दुपारी १२ वाजता कोल्हापूर न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.