जिओनीचे चेअरमन जुगारात हरले १००० कोटी !

gionee
बीजिंग – चीनची स्मार्टफोन कंपनी जियोनी दिवाळखोरीच्या दिशेने पोहोचली असून हे सर्व काही जिओनीचे चेअरमन लियू लिरॉनच्या जुगार व्यसनामुळे झाले असून अँड्रॉइड अथॉरिटीच्या अहवालानुसार, लिरॉन यांनी १००८ कोटी रुपयांचा (१४.४ दशलक्ष डॉलर्स) जुगारात गमावल्याचे कबूल केले आहे.

चीनच्या जेमिया संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार जिओनी त्याच्या पुरवठादारांचे पैसे देण्यास असमर्थ आहे. म्हणूनच २० पुरवठादारांनी जिओनीला दिवाळखोर घोषित करण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. याबाबत जिओनीचे चेअरमन लिरॉन म्हणतात की त्यांनी कंपनीच्या पैशाचा वापर जुगारमध्ये केला नाही. परंतु, ते कंपनी निधीतून कर्ज घेऊ शकतात. जियोनीने एप्रिलमध्ये सांगितले की, यावर्षी भारतात 650 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. कारण, त्यांना येथे टॉप ५ स्मार्टफोन ब्रँडमध्ये राहायचे आहे. यावर्षी एप्रिलमध्ये कंपनीने जिओनी एफ २०५ आणि जिओनी एस ११ लाइट फोन लॉन्च केला होता. हे दोन्ही फोन सेल्फी प्रेमींना लक्षात घेऊन बाजारात आणले होते.

Leave a Comment