बँकेच्या ‘या’ सर्व फ्री सेवांवर लागणार सर्विस चार्ज

bank
मुंबई : आता एटीएममधून पैसे काढणे कमी होऊ शकते. कारण एटीएममधून पैसे काढण्यावर आता तुम्हाला काही पैसे मोजावे लागणार आहेत. फ्री सर्विस बंद करण्याचे बँकांनी ठरवले आहे. एटीएममधून आतापर्यंत महिन्याभरात ३ वेळा फ्रीमध्ये पैसे काढता येत होते. पण त्यावर आता सर्विस चार्ज लागणार आहे. हे पैसे SBI, HDFC, ICICI, AXIS आणि कोटक महिंद्रा बँक ग्राहकांकडून वसूल करु शकते.

एटीएममधून पैसे काढणे, लॉकर विजिट आणि अनेक सेवा बँकेकडून मोफत दिल्या जात होत्या. पण या सर्विस आता महागणार आहेत. सर्विस चार्ज वाढवण्याचा निर्णय बँकांनी घेतला आहे. या सेवांसाठी बँकांना आतापर्यंत जवळपास ४० हजार कोटी रुपये मोजावे लागत होते. बँकांनी राजस्व विभाग आणि अर्थ खात्याला सूट देण्याची मागणी केली होती.

मीडिया रिपोर्टनुसार, आता पंतप्रधान कार्यालयात हे प्रकरण पोहोचले आहे. बँक आणि अर्थ खात्यांच्या अधिकाऱ्यांची या समस्येवर समाधानासाठी बैठक बोलावण्यात आली. याच आठवड्यात यावर निर्णय होऊ शकतो. ग्राहकांना एटीएम ट्रांजेक्शन, फ्यूल सरचार्ज रिफंड, चेक बुक, डेबिट कार्ड सारख्या सेवा आता मोफत नाही मिळणार. टॅक्स डिपार्टमेंटने ४० हजार कोटींचा टॅक्स मागितला आहे. हा टॅक्स आता बँका ग्राहकांकडूनच वसूल करण्याच्या विचारात आहे.

राजस्व विभागाने बँकिंग सेवेवर सर्विस टॅक्स शिवाय त्यावरचे व्याज देखील जमा करण्यास सांगितले आहे. हा सर्विस टॅक्स त्या गोष्टींवर लावला जातो जो ग्राहकांना बँकेकड़ून मोफत मिळते.

Leave a Comment