कर्मचाऱ्यांना पगार दुप्पट करण्याची संधी देत आहे इंफोसिस

infosys
मुंबई : आपल्या कर्मचाऱ्यांना पगार दुप्पट करण्याची संधी देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी इंफोसिस देत असून कर्मचाऱ्यांचे स्किल वाढवण्यासाठी आणि एट्रीशन रेट कमी करण्यासाठी कंपनीने हा उपाय शोधून काढला असून यामार्फत पगार दुप्पट होऊ शकतो.

याबाबत कंपनीच्या म्हणण्यानुसार इन्फोसिस नवीन ब्रिज पोग्राम पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दुप्पट पगार देणार आहे. कर्मचारी यामार्फत नोकरी न सोडता नवीन स्किलचा विकास करू शकतात. आपली स्किल जे कर्मचारी वाढवणार आहेत त्यांच्या पगारात ८० ते १२० टक्के वाढ होणार आहे.

४०० लोकांना या प्रोग्राम अंतर्गत ट्रेन केले जाणार आहे. या प्रोग्रामचा मुख्य हेतू असा की, कर्मचारी नोकरी सोडून जाणार आहे. यामुळे ज्युनिअर पोझिशनवर कमी एट्रीशन रेट असणार आहे. इन्फोसिसने ६ नवीन ब्रिज प्रोग्राम तयार केले आहेत. यामध्ये ब्रिज टू कंसलटिंग, ब्रिज टू पावर प्रोग्रामिंग, ब्रिड टू डिझाइन, ब्रिज टू टेक आर्किटेक्टर सारख्या कार्यक्रमांचा समावेश आहे.

आर्थिक वर्ष २०१८मध्ये इन्फोसिसने कर्मचाऱ्यांवर ३२,४७२ करोड रुपये खर्च केले आहे. आर्थिक वर्ष २०१७मध्ये कंपनीने ३०,९९४ रुपयांचा खर्च करून ४.९ टक्के वाढ केली होती. कंपनीने उचलेल्या पाऊलामुळे खर्चात आणखी वाढ होऊ शकते.

Leave a Comment