भरतकाम केलेले जगातील पहिले कुराण त्याने लिहिले

Kuran
मुस्लिमांचा पवित्र धर्मग्रंथ असलेला कुराण सिरियामधील एका कलाकाराने चक्क भरतकाम करून तयार केले आहे. भरतकाम करून कुराणमधील सुरा आणि या सुरेतील हरएक आयत त्याने लिहिले आहे. तब्बल १२ वर्षे ही अप्रतिम कलाकृती तयार करण्यासाठी या कलाकाराला लागली.

या कलाकाराचे नाव मोहम्मद माहिर हाद्री असे असून मोजक्याच सामग्री आणि आपल्या कौशल्याच्या जोरावर त्यांनी कुराण अनोख्या रुपात समोर आणले आहे. मोहम्मद हे उत्तम सुलेखनकार असून भरतकामही ते करतात. त्यांनी या दोन्ही कलेचा संगम साधत कुराण तयार करायला घेतले. १४ वर्षांपासून ते स्कार्फ, कपडे यावर भरतकाम करून आपली उपजिविका करत आहे. त्यांना कुराण लिहण्याची कल्पना १२ वर्षांपूर्वी याच कलेचा वापर करून सुचली.

त्याने जुनी शिलाई मशिन, सोनेरी चंदेरी रंगाचे रेशमी दोरे आणि वेलवेटचा कपडा एवढ्या सामग्रीत भरतकाम करत कुराण तयार केले. ३९ कोटींच्या घरात ४२६ पानी या कलाकृतीची किंमत असल्याचे म्हटले जाते.

Leave a Comment