अन्न शिजवण्यासाठी या धातूंनी बनविलेल्या भांड्यांचा वापर सर्वोत्तम

cook
कोणताही पदार्थ खाता-पिताना याचा आपल्या आरोग्यावर कसा परिणाम होईल याबद्दल आजकाल प्रत्येकजण विचार करू लागला आहे. म्हणूनच घरामध्ये किंवा बाहेर भोजन करताना त्यामध्ये वापरले जाणारे पदार्थ उत्तम प्रतीचेच असावेत असा सर्वांचाच आग्रह असतो. ज्याप्रमाणे भोजन बनविताना वापरले जाणारे सर्व पदार्थ आरोग्यासाठी लाभकारी आणि पूर्णपणे सुरक्षित असण्यावर आपण भर देत असतो, त्याच प्रकारे अन्न शिजविताना ते कशा प्रकारच्या भांड्यांमध्ये शिजविले जात आहे या वर लक्ष देणेही अगत्याचे आहे. आजकाल सर्व प्रकारच्या धातूंनी किंवा मिश्र धातूंचा उपयोग करून भांडी बनविली जातात. पण हे सर्वच धातू अन्न शिजविण्याच्या दृष्टीने सुरक्षित असतीलच असे नाही. त्यामुळे अन्न शिजविण्यासाठी कोणत्या प्रकारच्या भांड्यांचा उपयोग सुरक्षित आहे हे जाणून घेणे महत्वाचे ठरते.
cook1
सर्वसामान्यपणे वापरली जाणरी स्टेनलेस स्टीलची भांडी विविध धातूंच्या मिश्रणाने (alloy) बनविली जात असतात. यामध्ये ‘१०/१८’ या मिश्रणाने बनविली गेलेली भांडी अन्न शिजविण्याच्या दृष्टीने सर्वोत्तम समजली जातात. ‘१०” हा आकडा दहा टक्के प्रमाण निकेल या धातूचे दर्शवितो. या धातुमुळे भांड्याला चमक मिळते, तर ‘अठरा’ हा आकडा अठरा टक्के क्रोमियम धातू दर्शवितो. या धातूमुळे भांड्याला गंज लागत नाही. त्यामुळे स्टीलची भांडी खरेदी करताना ‘१०/१८’ हे प्रमाण पाहूनच खरेदी करावीत. ही भांडी बनविताना त्यामध्ये काही प्रमाणात तांबे आणि अॅल्युमिनियमही वापरले जाते. ही भांडी अन्न शिजविण्याच्या दृष्टीने सुरक्षित समजली जातात. काही व्यक्तींना मात्र या भांड्यांमध्ये असलेल्या निकेल धातूची अॅलर्जी होऊ शकते, पण हे सहसा होताना दिसत नाही.
cook2
‘कास्ट आयर्न’ किंवा लोखंडाची भांडी अतिशय मजबूत आणि वर्षानुवर्षे टिकून राहणारी असतात, तसेच ही भांडी चांगली वजनदारही असतात. या भांड्यांचा पहिल्यांदा वापर करण्यापूर्वी यांना ‘सीझन’ करणे आवश्यक असते. हे ‘सीझनिंग’ भांड्यांना तेल लावून घेऊन मग ही भांडी विस्तवावर चांगली तापवून केले जाते. या भांड्यांमध्ये शिजविलेल्या अन्नामध्ये या भांड्यांतील लोह उतरत असते आणि हे लोह आरोग्यासाठी लाभकारी समजले जाते. आजकाल या लोखंडाच्या भांड्यांवर सिरॅमिक किंवा इनॅमल कोटिंगही केलेले असते. अश्या भांड्यांतील लोह मात्र त्यामध्ये शिजणाऱ्या अन्नामध्ये उतरू शकत नाही.
cook3
टायटेनियम पासून बनलेली भांडी विषारी घटक विरहित असतात. त्यामुळे अनेक मेडिकल उपकरणे बनविण्यासाठी याच धातूचा वापर केला जात असतो. तसेच ‘डेंटल इम्प्लांट’, किंवा ‘जॉईंट रिप्लेसमेंट’ सारख्या वैद्यकीय प्रोसीजरसाठी देखील या धातूचा वापर होतो. टायटेनियमने बनविलेल्या भांड्यांचा तळ अॅल्युमिनियमचा वापर करून बनविण्यात येतो. पण अॅल्युमिनियमच्या थरावर पुन्हा टायटेनियमचा थर असल्याने अॅल्युमिनियम मधील घातक तत्वे अन्नामध्ये शिरू शकत नाहीत. या भांड्यांमध्ये अन्न तळाला अजिबात चिकटत नसल्याने या भांड्यांमध्ये अन्न शिजविताना कमीत कमी तेलाचा किंवा पाण्याचा वापर करता येणे शक्य होते.

Leave a Comment