आयडिया देत आहे ४९९ रुपयांत १६४ जीबी डेटा

नवी दिल्ली : आयडियाने टेलिकॉम क्षेत्रात रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आपल्या ग्राहकांसाठी एक प्लॅन बाजारात आणला असून ४९९ रुपयांचा प्लॅन आयडियाने आणला असून ग्राहकांना यामध्ये दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि १०० एसएमएस रोज मोफत पाठविण्याची सुविधा मिळणार आहे. ८२ दिवसांची या प्लॅनची वैधता आहे. आयडियाने याआधी बाजारात १८९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन लॉन्च केला होता. ग्राहकांना यामध्ये दररोज २ जीबी डेटा उपलब्ध होता. ५६ दिवसांची या प्लॅनची वैधता आहे.

सध्या व्होडाफोन कंपनीकडून सुरु असलेल्या ५११ रुपयांच्या प्लॅन सारखा आयडियाने लाँच केलेला ४९९ रुपयांचा प्लॅन हा आहे. ग्राहकांना व्होडाफोनच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि १०० एसएमएसची सुविधा देण्यात आली आहे. तर याची वैधता ८४ दिवसांची आहे.

Leave a Comment