न्यूयॉर्कमधील एका टीव्ही शोमध्ये सोफीयाने गायले गाणे

सौदी अरेबियाचे नागरिकत्व मिळावलेल्या ‘सोफिया’ या रोबोने नुकतेच एका प्रसिद्ध अभिनेत्यासोबत गाणे गायल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. सोफीयाने ही अनोखी करामत जिमी फॉलन याने होस्ट केलेल्या ‘द टुनाईट शो जिमी फॉलन’ या न्यूयॉर्कमधील एका टीव्ही शोमध्ये करुन दाखवली. ‘से समथिंग’ हे एक रोमॅंटीक ड्युएट गाणे सोफीयाने गायले.

उपस्थितांची मने तिच्या गाण्याने तर जिंकली. पण त्याचबरोबर तिला विचारण्यात आलेल्या प्रश्नांचीही अतिशय नेमकी उत्तरे तिने दिल्याने कार्यक्रमाला उपस्थित असणारे लोक चकीत होत होते. तिने यामध्ये तिची लहान बहीण असलेल्या लिटील सोफीयाचीही ओळख करुन दिली. इतरही काही रोबोट या कार्यक्रमात सहभागी झाले होते. एका देशाचे पूर्ण नागरिकत्व मिळविणारी ‘सोफिया’ ही जगातील पहिली आणि सध्या एकमेव मानवीय रोबो आहे. सोफियाची निर्मिती हाँगकाँगस्थित हॅनसन रोबॉटिक्सने केली आहे.

सोफिया माणसांप्रमाणेच आपल्या भावना व्यक्त करू शकते. सोफियाचे निर्माते डेव्हिड हॅनसन यांच्यामते वयोवृद्धांची मदतनीस ही संकल्पना मुळाशी धरून सोफियाची निर्मिती ही केली आहे. विचारलेल्या प्रश्नांना सोफिया अगदी व्यवस्थित उत्तरे देते. तिला उत्तरे कोणी पढवलेली नाहीत, तर अवतीभवती जे काही घडते, ते समजून घेऊन ती त्यातून शिकत असते. आजूबाजूच्या गोष्टी पाहून त्यांचे अर्थ लावणारे प्रोग्राम तिच्यात आहेत. ती ऑनलाइन जाते आणि तिथे कशावर चर्चा होते, कोणत्या बातम्या येतात, हेही बघत असते. मात्र अशाप्रकारे रोबोटने गाणे गाण्याची ही पहिलीच वेळ होती. सर्व वाद्यवृंदासोबत तिने अतिशय चांगले गाणे गायले.

Leave a Comment