येत्या काही दिवसात इन्स्टाग्राममध्ये युजर्सना पाहायला मिळणार अनेक नवीन बदल

मुंबई – आपल्या युजर्ससाठी इन्स्टाग्राम नवनवीन फीचर्स घेऊन येत असते. इन्स्टाग्राममध्ये युजर्सना येत्या काही दिवसात अनेक नवीन बदल पाहायला मिळणार आहेत. प्रोफाइल, फीचर, आयकॉन्स आणि बटण इन्स्टाग्राममध्ये अधिक आकर्षक करण्यात येणार आहे. या संदर्भात चाचणी सुरू असल्याची माहिती देण्यात आली असून या नव्या फिचर्सच्या मदतीने युजर्स आपल्या मित्रमैत्रिणींसोबत चांगल्या पद्धतीने कनेक्ट होणार आहेत.

कोणातही बदल इन्स्टाग्राम युजर्सच्या प्रोफाईल कंटेंटमध्ये होणार नसल्याचे कंपनीने सांगितले आहे. पण नवीन फीचर अॅड झाल्यानंतर फॉलो आणि मेसेजचे बटण बाजूबाजूला येणार आहे. तसेच जेव्हा कोणाच्याही प्रोफाइलवर आपण टॅप करू आपल्याला तेव्हा म्यूच्युअल फॉलोअर्स दिसणार आहेत. इन्स्टाग्रामचा वापर करणे युजर्संना अधिक सोयीचे व्हावे यासाठी प्रयत्न करत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

काही खास बदल इन्स्टाग्राम रीडिझाईनमध्ये करण्यात येणार आहेत. यामध्ये फॉलोअर्स काऊंट आधीच्या तुलनेत वेगळ्या पद्धतीने दिसणार आहेत. इन्स्टाग्रामने गेल्या आठवड्यात युजर्स अॅपवर किती वेळ घालवतात हे सांगणार नवे फीचर आणले होते. तसेच फेक फॉलोअर्स आणि स्पॅमर्सला रोखण्यासाठी कंपनीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. काही दिवसांपूर्वी ट्वीटरनेही आपल्या iOS अॅपमध्ये अशाच प्रकारचे काही बदल केले आहेत.

Leave a Comment