केटीएमची २०० ड्युक एबीएस बाईक लॉन्च - Majha Paper

केटीएमची २०० ड्युक एबीएस बाईक लॉन्च

मंबई : भारतीय बाजारात टू व्हिलर निर्माता कंपनी केटीएमने आपली आणखीन एक नवी बाईक लॉन्च केली आहे. कंपनीने यावेळी ‘२०० ड्युक एबीएस’ ही बाईक लॉन्च केली आहे. यापूर्वी, अॅडव्हेंचर बाईक ‘केटीएम ३९०’ भारतीय बाजारात लॉन्च करण्याची इच्छा कपंनीने दर्शवली. २०१८मध्ये ही बाईक भारतात दाखल होऊ शकते.

२०० ड्युक परंतु, एबीएसशिवाय असलेल्या वर्जनची दिल्ली एक्स शोरुम किंमत १,५१,७५७ रुपये आहे. २०० ड्युक एबीएससहीत बाईकमध्ये २५ पीएस पॉवर आहे. तसेच ट्रेलिस फ्रेम, अॅल्युमिनिअम स्विंगआर्म आणि उलट सस्पेन्शन यांसहीत रेसिंग उपकरणांसहीत ही बाईक दमदार अनुभव देते. बॉशद्वारे सादर करण्यात आलेल्या २०० ड्युक एबीएस अधिक नियंत्रणासोबत थांबण्याची ताकद बाईकला देते. २०० ड्युक एबीएस ही बाईक नारंगी, सफेद आणि काळ्या अशा तीन रंगांत उपलब्ध असेल. बाईकची दिल्लीत एक्स शोरुम किंमत १.६० लाख रुपये आहे.

Leave a Comment