बंगळुरुच्या कर्मचाऱ्यांना मिळतो देशातील सर्वाधिक पगार

मुंबई : स्वतःपेक्षाही इतरांचा पगार जाणून घेणे हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. बंगळुरुने देशभरात सर्वाधिक पगार मिळणाऱ्या शहरांच्या यादीत अव्वल स्थान मिळवळे आहे, तर या यादीत मुंबईचा दुसरा क्रमांक लागतो.

बंगळुरुतील कर्मचाऱ्यांना सरासरी वार्षिक १२ लाख रुपये पगार मिळतो. ही माहिती ‘लिंक्डइन’ने केलेल्या सर्वेक्षणात उघड झाली आहे. त्यानंतर मुंबई, दिल्ली (एनसीआर), हैदराबाद आणि चेन्नई या शहरांचा क्रमांक टॉप ५ मध्ये लागतो. सरासरी वार्षिक ९ लाखांचे पॅकेज मुंबईकरांना मिळते.

दिल्लीतील कर्मचारीही मुंबईइतकेच नशीबवान आहेत. वर्षाला त्यांना सरासरी ८.९९ लाख रुपये पगार मिळतो. ८.४५ लाख रुपये चौथ्या क्रमांकावरील हैदराबादचे कर्मचारी कमवतात. चौथ्या आणि पाचव्या स्थानावरील कर्मचाऱ्यांचा पगारात मोठी तफावत आहे. ६.३ लाख रुपये चेन्नईच्या कर्मचाऱ्यांचे सरासरी वार्षिक पॅकेज आहे.

या सर्वेक्षणात हार्डवेअर आणि नेटवर्किंग क्षेत्रातील प्रोफेशनल्सना तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांपेक्षा अधिक पगार मिळत असल्याचे पुढे आळे आहे. कंपनीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सीओओ किंवा वरिष्ठ पदांवर कार्यरत कर्मचाऱ्यांना हा पगार मिळतो.

Leave a Comment