शाओमीने एकाच दिवसात विकले ६ लाख मोबाईल

बंगळुरू – बाजारपेठेत चिनी मोबाईल कंपनी शाओमीने भारतीय चांगलेच बस्तान बसविले असून शाओमीने बाजारपेठेवर आणखी पकड मिळविण्यासाठी ग्राहकांसाठी काल ब्लॅक फ्रायडे सेलची घोषणा केली होती. विशेष म्हणजे गुरुवारी लाँच करण्यात आलेल्या ‘रेडमी नोट ६ प्रो’वर १ हजार रुपयाची खास सवलत मिळत आहे. कंपनीने एकाच दिवसात ६ लाख मोबाईल विकण्यात आल्याचा दावा केला आहे.

क्वाड कॅमेरा ऑल राउंडर मोबाईलचा सेल पहिल्यांदाच सुरू करण्यात आला. यावेळी ६ लाख मोबाईल एमआय. कॉम व फ्लिपकार्टवरुन विकले गेल्यामुळे स्टॉक संपला आहे. पण काळजी करु नका. आम्ही तीन वाजता आणखी सेल सुरू करत आहोत, असे शाओमी इंडियाचे उपाध्यक्ष मनु कुमार जैन यांनी ट्विट केले.

शाओमीने १३ हजार ९९९ रुपये किंमतीचा (४ जीबी रॅम ) आणि १५ हजार ९९९ रुपयांचा (६ जीबी रॅम) रेडमी नोट ६ प्रो लाँच केला आहे. या दोन्ही मोबाईलवर सेलमध्ये एक हजार रुपयाची सवलत देण्यात येणार आहे. हा सेल फक्त आजपुरता असल्याचे शाओमीने म्हटले आहे. फक्त फ्लिपकार्ट, एमआय होम्स, शाओमीच्या वेबसाईटवर हा सेल उपलब्ध असणार आहे.

रेडमी नोट ६ प्रोचा एफएचडी, आयपीएसचा ६.२६ इंच स्क्रीन आहे. रॅम ४ जीबी असलेल्या मोबाईलमध्ये २०मेगापिक्सल+२मेगापिक्सल कॅमेरा आहे. तर ६ जीबी रॅम असलेल्या मोबाईलमध्ये १२मेगापिक्सल+५मेगापिक्सल कॅमेरा आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम्न स्नॅपड्रॅगन ६३६ ऑक्टा-कोअर हे सर्वात आधुनिक प्रोसेजर आहे. तर दोन्ही मॉडेलची बॅटरी ही ४००० mAh आहे. तर दोन्ही मोबाईलची मेमरी ही ६४ जीबी आहे. एचडीएफसीच्या क्रेडिट कार्ड व डेबिट कार्ड, एमएमआयवरुन खरेदी केल्यास ग्राहकांना ५०० रुपये सवलत मिळणार आहे.

Leave a Comment