पॉर्न स्टार होण्यासाठी तिने आधी घर, मग धर्माचाही केला त्याग

yasmina-ali
सोशल मीडियात नेहमीच अफगाणिस्तानी वंशाची प्रसिद्ध पॉर्नस्टार यास्मीना अली चर्चेत असते. ९ वर्षांची असताना यास्मिनाने देश सोडला होता. तसेच पोर्न इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी तिने इस्लाम धर्मही त्याग केला. एका मुलाखतीदरम्यान यास्मिना म्हणाली, आपल्या या कामावर आपण आनंदी असून तिला देश आणि धर्म त्याग करावा लागला याबद्दल काहीही वाईट वाटत नसल्याचेही तिने स्पष्ट केले.

यास्मिना म्हणाली, मला आवडीचे काम निवडण्याचे स्वातंत्र्य इस्लाम धर्मात राहून मिळाले नसते. मी त्यामुळे या धर्माचा त्याग केला. मला त्यानंतर माझ्या आवडीचे काम करण्याची संधी मिळाली. आज पॉर्न वर्ल्डमधील यास्मिना प्रसिद्ध नाव आहे. काही लोकांना माझा मार्ग आवडणार नाही, पण मी कामावर आनंदी आहे. अनेक महिलांवर अन्याय होताना धर्म मात्र त्याकडे दुर्लक्ष करतो असे ती म्हणाली.

यास्मिना म्हणाली, माझ्या वडिलांनी सर्वात आधी माझ्यावर इस्लाम धर्म थोपवला. मी आधी अफगाणिस्तानात असताना जेव्हा लहान होते तेव्हा आणि नंतर ब्रिटनमध्ये जेव्हा मी तरुण होत होते. तेव्हा माझे आई वडिल मला म्हणाले की, धर्म सर्वात महत्त्वाचा आहे. अगदी मुले आणि आई वडिलांमधील प्रेमापेक्षाही इस्लाम अधिक महत्त्वाचा आहे. मी काय कपडे परिधान करावे, काय विचार करावा, काय व्हावे हे सर्वदेखिल मला आई वडील सांगत होते.

Leave a Comment