टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीनच्या किंमती वाढवण्याच्या तयारीत इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या

electronics
नवी दिल्ली – तुम्ही जर टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन यांसारखी उत्पादने सणासुदीच्या काळात खरेदी केली नसतील तर ही उत्पादने खरेदी करणे आता तुम्हाला महागात पडू शकते. कारण इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किमती वाढवण्याच्या तयारीत अनेक कंपन्या आहेत.

रुपयाची डॉलरच्या तुलनेत झालेली घसरण आणि परदेशी वस्तूंवर वाढलेल्या कस्टम डय़ुटीचा फटका घरगुती वापराच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंना बसणार आहे. या किंमती ३ ते १० टक्क्यांनी वाढू शकतात. ही दरवाढ गेल्या महिन्यातच होणार होती. पण ही वाढ सणासुदीचा काळ असल्याने पुढे ढकलण्यात आली होती. अनेक कंपन्यांनी रिटेलर्सना दिली जाणारी १० टक्के सूट देखील रद्द केल्याची माहिती आहे. आपल्या वस्तूंवरील सामान्य विक्री किमतीवरील १० टक्केपर्यंतच्या डिस्काऊंटसाठी दिली जाणारी सबसिडी एलजी, सॅमसंग आणि सोनीने मागे घेतली आहे. हायर इंडियाने त्यांच्याकडील इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किमतीत ५ ते ८ टक्क्यांनी वाढ केली आहे. बॉश, सीमेन्स, शाओमी आणि बीपीएल यांसारख्या कंपन्याही लवकरच किमतींमध्ये वाढ करणार आहे.

Leave a Comment