या गोष्टींवर शास्त्रज्ञांचा देखील होता विश्वास !

thing
विज्ञानामध्ये हर दिनी नवनवीन लहान-मोठे शोध लागतच असतात. या शोधांच्या परिणामस्वरूप समस्त सृष्टीबद्दल मानवाचे ज्ञान दिवसेंदिवस वाढत चालले आहे. इतकेच काय, पण सृष्टीबाहेरील, म्हणजेच परग्रहावरील सृष्टी बद्दलही नवे शोध सातत्याने लावले जात आहेत. मानवाला आजच्या काळामध्ये असलेले वैज्ञानिक ज्ञान, हे अनेक वर्षांच्या अभ्यासाचे आणि निरनिराळ्या प्रयोगांचे फळ म्हणता येईल. त्यामुळे आजच्या काळामध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी वैज्ञानिक आधार आहे. पण एक काळ असा होता, जेव्हा त्या काळी समाजामध्ये असलेल्या काही मान्यतांना कोणताही वैज्ञानिक आधार नसून केवळ त्या गोष्टी समाजामध्ये प्रचलित असल्याने त्यांचा स्वीकार केला गेला होता. याला वैज्ञानिक देखील अपवाद नव्हते. आजच्या काळामध्ये या गोष्टी कदाचित आपल्याला हास्यास्पद वाटतीलही, पण सामाजिक मान्यता म्हणून काही गोष्टींवर शास्त्रज्ञांनी देखील विश्वास ठेवला होता. अश्याच काही गोष्टी आपण जाणून घेऊ या.
thing1
१८६०च्या दशकापूर्वी रुग्णाला तपासल्यानंतर किंवा अगदी एखादी शस्त्रक्रिया केल्यानंतर देखील डॉक्टर्स हात धुवत नसत. ‘जंटलमन’ किंवा एखाद्या सभ्य गृहस्थाचे हात नेहमीच स्वछ असतात अशी सामाजिक मान्यता असल्याने आणि डॉक्टर्सच्या समावेश अर्थातच ‘सभ्य गृहस्थ’ या श्रेणीमध्ये होत असल्याने डॉक्टर्स हात धुवत नसत. इतकेच नव्हे, तर इस्पितळातील चादरी, इतर कपडे आणि अगदी डॉक्टर वापरत असलेले एप्रन देखील धुण्याची पद्धत त्याकाळी नव्हती. शस्त्रक्रियांसाठी वापरली जाणरी उपकरणे देखील वापरात नसतानाच धुतली जात असत. १८६५ साली हंगेरियन फिजिशियन इग्नाझ फिलीप सेमेलवाईस यांनी सर्वप्रथम ‘थियरी ऑफ जर्म डिसीज’ म्हणजे जंतूंचा संसर्ग झालेल्या हातांनी रुग्णाला तपासल्याने रुग्णाला जंतूचा संसर्ग होऊ शकतो, या थियरीचा पुरस्कार करीत, डॉक्टरांनी वारंवार हात धुवून ते निर्जंतुक करणे महत्वाचे आणि आवश्यक असल्याचे म्हटले. त्याच्या या विचारांची इतर डॉक्टरांनी इतकी खिल्ली उडविली, की त्यापायी इग्नाझला मानसिक नैराश्य येऊन त्याला इस्पितळामध्ये भरती करण्याची वेळ आली. एकोणिसाव्या शतकामध्ये मात्र ‘थियरी ऑफ जर्म डिसीज’ चा स्वीकार केला जाऊन, त्यानंतर हात धुणे, किंवा वस्तू निर्जंतुक करण्याची पद्धत रुग्णालयांमध्ये रूढ होऊ लागली.
thing2
मर्क्युरी, म्हणजेच पारा हा अतिशय घातक समजला जातो. पण एके काळी ‘लिक्विड सिल्व्हर’ या नावाने ओळखला जाणारा पारा, वैज्ञानिक आणि वैद्यकीय तज्ञ सर्रास वापरीत असत. बहुतेक आजारांवर अक्सीर उपाय म्हणून पाऱ्याचा वापर केला जात असे. इतकेच नव्हे, तर चीनचे सम्राट क्वीन शी हुआंग डी यांना अमरत्व लाभावे यासाठी त्यांच्या वैद्यकीय तज्ञांनी पाऱ्याचा अंश असलेल्या गोळ्या देण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही काळातच हुआंग डी यांचे निधन, अर्थातच ‘मर्क्युरी पॉयझनिंग’मुळे झाले होते. सोळाव्या शतकापर्यंत पाऱ्याचा वापर औषधांमध्ये सर्रास केला जात असे. त्यामुळे रोगापेक्षा अधिक पाऱ्याने विषबाधा होऊन रुग्णांचा मृत्यू होत असे.
thing3
रेल्वेचा शोध लागण्यापूर्वी, जर एखाद्या माणसाने ताशी ३० मैलांपेक्षा जास्त वेगाने प्रवास केला, तर त्यांचा श्वास कोंडू शकतो अशी मान्यता रूढ होती. इतक्या वेगाने प्रवास करीत असताना लागणाऱ्या वाऱ्यामुळे श्वासोत्छ्वास करणे अशक्य होऊ शकते अशी समजूत समाजामध्ये रूढ होती. त्यामुळेच रेल्वेच शोध लागल्यानंतर देखील रेल्वेने प्रवास करणे मेंदूसाठी धोकादायक असल्याचे म्हटले जात असे. तसेच रेल्वेमध्ये सतत जाणविणारे धक्के आणि रेल्वेचा होणारा कर्कश आवाज यांमुळे देखील मेंदूवर विपरीत परिणाम होत असतात अशी समजूत होती. १८६०च्या दशकामध्ये रेल्वेमध्ये केलेल्या प्रवासामुळे अनेक व्यक्तींवर ‘दुष्परिणाम’ झाल्याचे म्हटले जात असे.

Leave a Comment