बँकांना या आठवड्यात तीन दिवस सुट्टी

bank
नवी दिल्ली – देशातील काही राज्यातील बँका या आठवड्यात आलेल्या सुट्ट्यांमुळे बंद राहणार आहेत. देशात विविध राज्यांमध्ये हा समप्रमाणात लागू नाहीत. पण या सुट्ट्या महाराष्ट्रातील बँकांना लागू असणार आहे.

मुस्लीम बांधवांचा ईद-ए-मिलाद हा येत्या २१ नोव्हेंबरला सण असून शिख धर्मगुरु गुरूनानक जयंतीनिमित्त २३ नोव्हेंबर रोजी बँका बंद राहतील. तसेच त्यानंतर लगेच येणारा शनिवार हा या महिन्यातील चौथा शनिवार असल्याने २४ नोव्हेंबरलाही बँकांचे कामकाज बंद राहणार आहे.

आर्थिक व्यवहार एकापाठोपाठ एक आलेल्या या सुट्ट्यांमुळे खोळंबण्याची शक्यता आहे. सलग येणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपली बँकेची कामे आज उरकून घेण्यासाठी नागरिकांनी बँकांमध्ये गर्दी केली आहे. दरम्यान, या सुट्ट्या देशातील सर्वच भागात एकसारख्या लागू नाहीत. महाराष्ट्रात मात्र या आठवड्यात ३ दिवस बँका बंद राहतील.

Leave a Comment