एलन मस्कच्या स्पेसएक्सला १२ हजार उपग्रह स्थापित करण्याची मंजुरी

spacex
टेस्लाचे माजी सीइओ आणि अमेरिकन कंपनी स्पेसएक्सचे संस्थापक एलन मस्क अंतराळात २०२० १२ हजार उपग्रह स्थापित करणार आहेत. अमेरिकन फेडरल कम्युनिकेशन कमिशन तर्फे स्पेसएक्स ला संदर्भातील मंजुरी दिली गेली आहे. यामुळे स्वस्त इंटरनेट सेवेला प्रोत्साहन मिळणार आहे आणि जगाच्या कानाकोपऱ्यात ब्रॉडबँडचे जाळे विस्तारण्यास मदत मिळणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मार्चमध्ये या कंपनीला ४४२५ उपग्रह पृथ्वीच्या खालच्या कक्षेत लाँच करण्याची मंजुरी एफसीसीने दिली होती तर शुक्रवारी अन्न्खी ७५१८ उपग्रह स्थापित करण्याची मंजुरी दिली गेली. हे सर्व उपग्रह २२० ते ११०० पौंड वजनाचे असतील आणि स्टारलिंक ब्रॉडबँड नेटवर्कसाठी स्थापित केले जातील. या उपग्रहांचे डिझाईन करताना जगभरातील कोणत्याही दुर्गम ठिकाणी हायस्पीड नेटवर्क अक्सेस दिला जाईल या पद्धतीने केले आहे. स्पेसएक्स सध्या दोन चाचणी उपग्रह टीनटीन ए आणि टीनटीन बी या नावाने फेब्रुवारीत लाँच केले आहेत.

Leave a Comment